Lumpy skin Disease: ‘लम्पी’ मुळे मृत पशुधनासाठी मिळणार मदत, केंद्र आणि राज्य सरकारचा मोठा निर्णय

0
Lumpy skin Disease

Lumpy skin Disease

(Lumpy skin Disease)राज्यातील ज्या भागांमध्ये जनावरांमध्ये लम्पी आजाराची लागण मोठ्याप्रमाणावर झाली आहे, त्याठिकाणी क्वारंटाईन सेंटर (विलगीकरण कक्ष) उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे. उत्तर भारतात लम्पीच्या साथीमुळे मोठ्याप्रमाणावर गुरे दगावली आहेत. देशभरात आतापर्यंत लम्पी आजारामुळे (Lumpy Skin Disease) ७० हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये लम्पीचा प्रसार वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता बाधित जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर्स उभारण्याची घोषणा केली आहे.

‘लम्पी’ मुळे मृत पशुधनासाठी मिळणार मदत

पाहण्यासाठी येथे click करा

एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, लम्पी आजाराचा प्रभाव आणखी वाढू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवून लम्पीची लागण झालेल्या जनावरांना आयसोलेट केले जाईल. त्यासंदर्भातील सूचना विभागीय आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच राज्यात लम्पी आजाराचा सामना करण्यासाठी लशींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आजार होऊन मृत झालेल्या पशुधनासाठी पशुपालकांना आर्थिक मदत मिळणार आहे. यासाठी राष्‍ट्रीय आपत्ती धोरणानुसार राज्य शासनाच्या १०० टक्के अर्थसहाय्यातून ही मदत दिली जाईल.

‘लम्पी स्कीन’ आजार (Lumpy skin Disease) होऊन मृत (Animal Died Due To Lumpy Skin) झालेल्या पशुधनासाठी पशुपालकांना आर्थिक (Financial Relief For Animal Death Due To Lumpy Skin) मदत मिळणार आहे. यासाठी राष्‍ट्रीय आपत्ती धोरणानुसार (National Disaster Policy) राज्य शासनाच्या १०० टक्के अर्थसहाय्यातून ही मदत दिली जाईल. या साठीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. दूधाळ पशुधनासाठी (Milch Livestock) ३० हजार, ओढकाम करणाऱ्या पशुधासाठी (बैल) २५ हजार, तर वासरांना १६ हजार रुपये मदत मिळेल. ही मर्यादा अनुक्रमे तीन, तर वासरांसाठी ६ ठेवण्यात आली आहे.

मदत देण्यासाठी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. निवासी जिल्हाधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा पशुचिकित्सालयांचे प्रमुख समितीमध्ये असेल.

३२ कोटी ५० लाखांची तरतूद

राज्यात १२६ पशुधनांचा मृत्यू झाला आहे. या पशुधनासाठी मदतीबाबत कोणतेही निकष नव्हते. या बाबत मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यानुसार राज्य सरकार मदत देणार आहे. यासाठी ३२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

‘लम्पी’ मुळे मृत पशुधनासाठी मिळणार मदत

पाहण्यासाठी येथे click करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *