palm farming: ‘या’ जादुई पिकाची करा लागवड मिळतील एकरी 4 लाख रुपये; शेतकऱ्यांना मिळते प्रति एकर 50,918 रुपये इतका अनुदान

palm farming:पाम शेतीमधून शेतकरी 12 महिने त्यातून उत्पादन घेऊ शकतो तसेच त्याच्या माध्यमातून बक्कळ पैसे सुद्धा कमवू शकतो. पाम तेलाला गोल्डन पाम असे सुद्धा ओळखले जाते. सध्या आपल्या देशातील 50,000 हेक्टर क्षेत्र पाम तेलाच्या झाडांची लागवडी खाली आहे तसेच पामची शेती 15 हुन अधिक राज्यांमध्ये केली जाते.पाम च्या पिकासाठी उपयुक्त जमीन:- पाम हे पावसावर अवलंबून असलेले झाड आहे. कोणत्या ही प्रकारच्या मातीमध्ये पाम ची लागवड करता येऊ शकते. रोग लागवडीसाठी या रोपांना 1मिटर मातीची खोली असणे गरजेचे असते. वाळूयुक्त आणि क्षारयुक्त जमिनीत पाम ची लागवड करू नये.

पाम तेलच का?

palm farming:मे महिन्यात इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतात खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती.

त्यामुळे आयातीवर अवलंबून राहू नये यासाठी केंद्र सरकारने पाम ऑईल मिशन ही योजना आणली. त्यासाठी 17 राज्यांची निवड करण्यात आली आणि 110 अब्ज रुपयांची तरतूद करण्यात आली.

केरळ, कर्नाटक, आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांनासुद्धा पाम तेलाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे.

मात्र पाम तेलाच्या लागवडीला चालना देण्यासाठी तेलंगाणा राज्य सर्वांत जास्त आघाडीवर आहे. त्यांनी आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना प्रति एकर 50,918 रुपये इतका निधी दिला आहे. बिया आणणं, ठिबक सिंचनाच्या सोयी निर्माण करणं आणि पाम तेलाचं पीक येईपर्यंत चार वर्षांत दुसरं एखादं पीक घेणं यासाठी हा निधी दिला जात आहे.

पाम तेलाचे फायदे तोटे

पाम तेलाच्या लागवडीला चालना देण्याआधी तेलंगाणाने भातशेतीला प्रोत्साहन दिलं होतं.

मात्र झारखंड, तामिळनाडू, केरळ, या राज्यातून तांदळाची मागणी कमी झाल्याने केंद्र सरकारला तेलंगणाकडून अतिरिक्त तांदूळ विकत घ्यावा लागला होता.

उकडीचा तांदूळ खरेदीच्या मुद्द्यावरून तेलंगणा आणि केंद्र सरकामध्ये काही काळापूर्वी संघर्ष निर्माण झाला होता.

आता मात्र तज्ज्ञांच्या मते पाम तेलामुळे शेतकरी आणि सरकार दोघांनाही फायदा होणार आहे.

उत्पादनाचा विचार केला असता तेलाच्या बियांपेक्षा पाम तेलातून जास्त उत्पादन मिळेल,”असं व्यापारतज्ज्ञ नरसिंहा मूर्ती म्हणाले. “प्रति हेक्टर 5000 किलो उत्पादन मिळण्याची शक्यता आहे,” ते म्हणाले.

शेतकऱ्यांना मिळते प्रति एकर  अनुदान

करा

Leave a Comment