puc certificate:PUC सर्टिफिकेट काढा 5 मिनिटात मोबाईलवर;पहा कसे काढायचे

puc certificate:कोणत्याही वाहनासाठी पीयूसी किंवा ‘पोल्युशन अंडर कंट्रोल’ प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या वाहनातून होणाऱ्या वायूंचं उत्सर्जन नियंत्रणात आहे आणि ते रस्त्यावर चालवायला सुरक्षित आहे की नाही, यासाठी उत्सर्जन चाचणी घेऊन पीयूसी प्रमाणपत्र दिलं जातं. तुम्ही कोणत्याही अधिकृत उत्सर्जन तपासणी केंद्रातून पीयूसी प्रमाणपत्र घेऊ शकता. पीयूसी प्रमाणपत्र वाहनाद्वारे उत्सर्जित कार्बन मोनोऑक्साइडचं प्रमाण कायद्याने घालून दिलेल्या मर्यादेत असल्याची खातरजमा करते. हे प्रमाणपत्र देशात वाहन चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे.

इर्डा च्या नोटिफिकेशननुसार वाहन मालकांना त्यांचा विमा रिन्यू करताना वैध पीयूसी सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक आहे. कायद्यानुसार, कोणतंही वाहन थर्ड-पार्टी इन्शुरन्सशिवाय चालवता येत नाही. पण या नियमाची नीट अंमलबजावणी होत नसल्यामुळे तो वारंवार मोडला जातो. इर्डा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आधारित आहे, ज्यामध्ये असं म्हटलंय की विमा पॉलिसी रिन्यू करण्याच्या तारखेला वैध पीयूसी सर्टिफिकेट असल्याशिवाय विमाधारक वाहनाचा विमा काढू शकत नाही. पण तुमच्याकडे वैध पीयूसी सर्टिफिकेट नसल्यास तुमचा विमा दावा नाकारला जाईल असं नाही,

भारत सरकारने 1989 च्या केंद्रीय मोटार वाहन नियमांतर्गत सर्व वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र अनिवार्य केलं आहे. त्यामुळे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाने वैध पीयूसी सर्टिफिकेटशिवाय वाहनांचा विमा काढू नये, असं विमा कंपन्यांना सांगितलंय,” असं एडलवाईस जनरल इन्शुरन्सचे मुख्य टेक्निकल ऑफिसर नितीन देव म्हणाले.

पीयूसी सर्टिफिकेटची वैधता-

puc certificate:तुम्ही नवीन कार खरेदी केल्यावर पीयूसी प्रमाणपत्र पहिल्या वर्षासाठी व्हॅलिड असतं. त्यानंतर, तुम्हाला दर तीन किंवा सहा महिन्यांनी पीयूसी तपासावं लागतं. पेट्रोल व डिझेल दोन्ही वाहनांच्या बाबतीत पीयूसी तपासावं लागतं. त्यामुळे, पीयूसी प्रमाणपत्र रिन्यू करण्यासाठी तुमच्या वाहनातील प्रदूषण उत्सर्जन पातळी नियमितपणे तपासणं अनिवार्य आहे.

इलेक्ट्रिक वाहनं-

इलेक्ट्रिक वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. “ईव्ही पर्यावरणास अनुकूल आहेत आणि त्यामुळे अशी कोणतीही तरतूद नाही

Leave a Comment