Aadhaar card Name Change: आधार कार्डवर चुकीचे नाव छापलं गेलंय? घरबसल्या या 3 सोप्या स्टेप्स फॉलो करून बदलून घ्या!

0
Aadhaar card Name Change

Aadhaar card Name Change

Aadhaar card Name Change:नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती आपणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आधार कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तावेज झालेला आहे. आधार कार्ड मध्ये बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत जसे की तुमच्या नावामध्ये बदल जन्मतारखेत बदल पत्त्यामध्ये बदल इत्यादी प्रकारच्या चुका आधार कार्ड मध्ये झालेले आहेत. तर आज आपण जाणून घेऊया की आधार कार्ड वरती झालेले चुका घरबसल्या 5 मिनिटात कशा दुरुस्त करायच्या.

तुमचे नाव आधारवर चुकीच्या पद्धतीने छापले गेले तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.आधार कार्ड हे आजच्या काळात आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे.प्रत्येक आवश्यक कागदपत्र बँकेत नेऊन आधार लिंक करणे जवळपास अनिवार्य झाले आहे. याशिवाय जवळपास सर्व शासकीय सुविधांसाठी ते सक्तीचे करण्यात आले आहे.

Aadhaar card Name Change:अशा परिस्थितीत जर तुमचे नाव आधारवर चुकीच्या पद्धतीने छापले गेले तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

अनेक ठिकाणी तुमची ओळख पडताळून पाहण्यासाठी आधार कार्डचाही वापर केला जातो. अशा परिस्थितीत आधारवर चुकीचे नाव छापल्यास तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नाव चुकीचे छापले तर अनेक शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागू शकते.

जर तुमचे नाव तुमच्या आधारमध्ये चुकीच्या पद्धतीने छापले गेले असेल, तर तुम्ही घरी बसल्या काही सोप्या ऑनलाइन स्टेप्स फॉलो करून ते अपडेट करू शकता.

आधार कार्डमधील नाव अपडेट करण्यासाठी, प्रथम तुम्हाला पोस्ट मधी दिलेय्ल्या लिंक वर जावे लागेल.

यानंतर तुमच्या समोर एक वेबसाईट ओपन होईल. होम पेजवर तुम्हाला आधार अपडेट या पर्यायावर जावे लागेल.येथे तुम्हाला दिलेल्या पर्यायातून Update Demographic Data Online वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला नवीन पेजवरील Proceed to Update Aadhaar या पर्यायावर जावे लागेल. त्यानंतर नवीन पेजवर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरावा लागेल आणि Send OTP वर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यावर, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर OTP मिळेल, जो तुम्हाला भरावा लागेल आणि लॉग इन करावे लागेल.

तिसर्‍या स्टेपमध्ये, तुम्हाला डेमोग्राफिक डेटा अपडेट करा वर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुमच्यासमोर अनेक पर्याय दिसतील, तुम्हाला जे काही सुधारायचे आहे त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला नाव सिलेक्ट करून Proceed बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला होय मला याची माहिती आहे यावर क्लिक करावे लागेल.

आधार कार्डवरील नाव बदलण्यासाठी

यावर क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed