Kanda chal anudan:कांदा चाळ बांधण्यासाठी आता एक लाख रुपये भेटणार; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाइन फॉर्म सुरु

Kanda chal anudan
Kanda chal anudan:कांदा चाळ बांधण्यासाठी आता एक लाख रुपये भेटणार; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाइन फॉर्म सुरु
Kanda chal anudan:कांदा चाळ बांधण्यासाठी आता एक लाख रुपये भेटणार; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाइन फॉर्म सुरु
नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आम्ही आपली बातमी या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत दररोज शेती संबंधित वेगवेगळ्या शासकीय योजना sarkari yojana, शेती संबंधित बातम्या farming news, शेतीपूरक व्यवसाय farming business व आधुनिक शेती advance agriculture अशा विविध गोष्टींविषयी संपूर्ण माहिती पोहोचवत आहोत. नक्कीच तुम्हाला या माहितीचा उपयोग होत असेल. याशिवाय तुमच्या शेतकरी मित्रांनाच अशी शेती विषयी माहिती मिळण्याकरिता आपले हे लेख तुमच्या मित्रांपर्यंत देखील पोहोचण्याचा प्रयत्न करा.
शेतकरी मित्रांनो आपण आजच्या लेखांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची माहिती घेऊन आलो आहोत. त्या गोष्टीचा अवलंब तुमच्या शेतामध्ये तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला त्यातून फायदा होऊ शकतो व तुमचे नुकसान होण्यापासून देखील तुम्ही वाचू शकता. सध्या थंडीचा सिझन चालू असून बरेच शेतकरी कांद्याची लागवड त्यांच्या शेतामध्ये करत आहेत. आज आपण पिकाविषयी नाही तर योजनेविषयी माहिती घेणार आहोत ती योजना म्हणजे कांदा चाळ अनुदान योजना. Kanda chal anudan
तर मग चला मित्रांनो बघूया कांदा चाळ योजना नक्की काय आहे? या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करावा? कोण कोणते शेतकरी या योजनेस पात्र ठरणार आहेत? यासोबतच अर्ज करत असताना कोण कोणते कागदपत्रे आवश्यक असतील? याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेऊया. Kanda chal anudan.
सर्वात आधी मित्रांनो जाणून घेऊया कांदा चाळ योजना नक्की काय आहे?
Kanda chal anudan
मित्रांनो कांदा चाळ ह्या गोष्टीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होतो. कारण ज्यावेळी बाजारामध्ये कांद्याला कमी दर असतो त्यावेळी शेतकऱ्याचा शेतमाल शेतातून निघाला तर त्या शेतकऱ्याला कमी दराला सामोरे जावे लागते. पण अशावेळी शेतकरी कांदा चाळमध्ये कांद्याची साठवणूक करून ज्यावेळेस कांद्याला दर येईल त्यावेळी कांद्याच्या चाळीमधून कांदा काढून ते विकू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्यापासून वाचते व त्यांना चांगला दर मिळून नफा होतो.
या योजनेमध्ये आपण खोल पणे पाहिले तर 5 मॅट्रिक टन, 10 मॅट्रिक टन, 15 मॅट्रिक टन, 20 मॅट्रिक टन, 25 मेट्रिक टन क्षमतेची कांदा चाळ उभा करण्याकरिता येणारा एकूण खर्च असतो त्या खर्चाच्या 50% रक्कम शेतकऱ्यांना शासनातर्फे दिली जाते किंवा प्रति मॅट्रिक टनामागे 3500 रुपये दिले जातात. एका लाभार्थी व्यक्तीला जास्तीत जास्त 25 मेट्रिक टन क्षमतेची कांदा चाळ बांधण्याकरिता इतके अनुदान देण्यात येते.