zp Yojana:जिल्हा परिषद अंतर्गत मिळणार 5 एचपी मोटर, झेरॉक्स मशीन मिरची कांडप यंत्र इत्यादी योजना साठी अर्ज सुरू; येथे करा अर्ज

0
zp Yojana

zp Yojana

zp Yojana:जिल्हा परिषद जालना यांच्या अंतर्गत योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत . स्वउत्पन्नातून 20 % टक्के उपकार योजना आणि 5 % टक्के दिव्यांग कल्याण निधी या दोन योजना सध्या सुरू आहेत . दिव्यांग कल्याण निधीमधून दिव्यांग व्यक्तींना 100 टक्के अनुदान हे दिले जाणार आहे .

online अर्ज करण्यसाठी

यावर क्लिक करा

समाज कल्याण विभागामार्फत खालील दिलेल्या योजना ह्या राबविण्यात येणार आहेत .

  • मागासवर्गीयांना मिरची कांडप यंत्र या इतर साहित्य पुरविणे मागासवर्गीय शेतकऱ्यांना तुषार संच पुरविणे •
  • मागासवर्गीयांना 5 एचपी पाण्यातील विद्युत पंप पुरविणे
  • मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरविणे मागासवर्गीयांना मिनी पिठाची गिरणी मशीन पुरविणे
  •  दिव्यांगांना झेरॉक्स मशीन पुरविणे
  • दिव्यांगांना स्वयंचलित सायकल पुरविणे
  • दिव्यांगांना मिनी पिठाची गिरणी पुरविणे

अटी व शर्ती मागासवर्गीयांसाठी zp Yojana

1. आधार कार्ड व
2. रहिवासी प्रमाणपत्र
3. लाभार्थी हा ग्रामिण भागातील मागासवर्गीय असावा
4. लाभार्थी हा दरिद्रय रेषेखालील असुन निवड ग्रामसभेमार्फत
5. जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिका – याचे असणे आवश्यक राहील .
6. लाभार्थीचे व 18 वर्षेपेक्षा कमी नसावे .
7. लाभार्थीच्या नावाचा 7/12 असणे आवश्यक
8. यापुर्वी कृषी विभाग , महिला बालकल्याण किंवा इतर विभागा मार्फत लाभ घेतलेलासल्याचे ग्रामसेक / ग्राविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र .
9. लाभार्थीकडे स्वतःचे मालकीची 500 चौ.फु. जागा असावी . त्यासाठी नमुना नं . 8 अ किवा 7/12 असावी . ( ही अट फक्त घरकुल योजनेसाठी आहे . )
10. लाभार्थी बेघर असावा किंवा लाभार्थीकडे पक्के घर नसावे

दिव्यांगांसाठी अटी व शर्ती zp Yojana

1. लाभार्थी हा ग्रामीण भागातील असावा तसेच वय 18 वर्ष पेक्षा कमी नसावे .
2. लाभार्थीचे दिव्यांग असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे ऑनलाईन प्रमाणपत्र 40 % पेक्षा कमी नसावे .
3. यापुर्वी लाभ न घेतल्याचे ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र ,
4. लाभार्थीकडे आधार कार्ड असणे आवश्यक .
5. लाभार्थीकडे स्वतःचे मालकीची 500 चौ.फु. जागा असावी . त्यासाठी नमुना नं . 8 अ किंवा 7/12 असावी . ( ही अट फक्त घरकुल योजनेसाठी आहे . )
6. लाभार्थी बेघर असावा किंवा लाभार्थीकडे पक्के घर नसावे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed