Farmer goverment schmes:विदर्भ – मराठवाड्यात देणार ११ हजार दुधाळ जनावरे ३०० कोटींचा निधी मंजूर;या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Farmer goverment schmes
Farmer goverment schmes:विदर्भ – मराठवाड्यात देणार ११ हजार दुधाळ जनावरे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : ३०० कोटींचा निधी
“या” शेतकऱ्यांना मिळणार लाभ
पाहण्यसाठी यावर click करा
नागपूर : ” विदर्भ मराठवाड्यात दूध उत्पादनाला प्रोत्साहन देण्याकरिता तब्बल ३०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे . या माध्यमातून येत्या काळात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या ( एनडीडीबी ) माध्यमातून ११ हजार दुधाळ जनावरांचे वितरण करण्यात येईल , अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
सावनेर तालुक्यातील नांदागोमुख येथे शुक्रवारी ( ता . २० ) आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते . गडकरी म्हणाले , राज्याच्या इतर भागांच्या | तुलनेत मराठवाडा विदर्भात दूध उत्पादन अत्यल्प आहे . त्यास चालना देण्यासाठी ‘ एनडीडीबी’च्या माध्यमातून मदर डेअरींचा ” प्रकल्प या भागात कार्यान्वित करण्यात आला . त्यातून दुधाची उत्पादकता वाढली असली तरी ती अपेक्षित नाही . त्यामुळे कृत्रिम रेतन , हिरव्या चाऱ्याची लागवड व इतर अनेक उपक्रम नियोजित आहेत . त्याकरिता ३०० कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.
Farmer goverment schmes:यातूनच मदर डेअरी अंतर्गतच्या दूध संघांना ११ हजार दुधाळ जनावरांचे वितरण केले जाईल . ” बायोगॅस तसेच या भागासाठी विशिष्ट पशुखाद्य उपलब्धता देखील प्रस्तावित आहे . पशुपालकांना घरपोच कृत्रिम रेतनाची सुविधा दिली जाईल . यापूर्वी ‘ माफसू’ला आयव्हीएफ तंत्रज्ञानासाठी दहा कोटी रुपये दिले आहेत . ‘ ” माझी मुले दूध पावडरची निर्यात आखाती देशांना करतात . न्यूझीलंड , ऑस्ट्रेलियातून त्याकरिता मिल्क पावडर खरेदी केली जाते . १२५ कंटेनर इतकी मिल्क पावडर निर्यात होते .. भारतातून मिल्क पावडर खरेदी करणे महागडी असल्याने परवडत नाही . यावर पर्याय म्हणजे आपल्या भागात दूध उत्पादनात वाढ करण्याची गरज आहे, “गडकरी यांनी सांगितले.