Pashupalan Yojana:गाई म्हैस खरेदीसाठी राज्य शासनाकडून मिळणार 80 हजार रु;ऑनलाइन अर्ज सुरू असा करा अर्ज

Pashupalan Yojana
Pashupalan Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गाई-म्हशींच्या खरेदी साठी सरकारकडून अनुदान दिले जाते. आणि हे अनुदान देत असताना काही मशीनच्या खरेदीसाठी जे निश्चित करण्यात आलेली किंमत आहे या किमतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जे अनुदान मिळते ते अनुदान आता दुप्पट होणार असल्याचे समजले आहे. याच्या अगोदर ही योजना राबवत असताना महाराष्ट्रातील बरेच जिल्हे वगळण्यात आलेले होते. जे जिल्हे या योजनेसाठी वगळण्यात आलेले होते त्या जिल्ह्यांचा देखील या योजनेमध्ये आता नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. हा निर्णय 31 जानेवारी 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पार पडलेला आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय आहे आज आपण याच्या सर्वांना बद्दल संपूर्ण माहिती आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
ऑनलाइन अर्ज सुरू
असा करा अर्ज
गाई खरेदीसाठी 70 हजार रु मिळणार
31 जानेवारी 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गाई खरेदी करण्यासाठी किंमत 70 हजार रुपये सरकारकडून निश्चित करण्यात आलेले आहे. आणि म्हशी खरेदी करण्यासाठी ची किंमत ही 80 हजार रुपये शासनाकडून निश्चित करण्यात आलेले आहे. याच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागात दूध व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपयोजना आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण उपाय योजना ही योजना फक्त मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिलेली आहे.
म्हैस खरेदीसाठी 80 हजार रु मिळणार
त्याच्यामुळे आता महाराष्ट्रातील सांगली , सातारा , कोल्हापूर , पुणे , सोलापूर , नाशिक हे जिल्हे यापूर्वी वगळण्यात आलेले होते. परंतु आता नाविन्यपूर्ण योजनेमध्ये या जिल्ह्याचा देखील नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. यापूर्वी दुधाळ गायची किंमत ही 40 हजार रुपये होती परंतु आता दुधाळ गायची किंमत ही 70 हजार रुपये करण्यात आलेली आहे. तर म्हशीची किंमत ही 61 हजार ऐवजी 80 हजार रुपये सरकारकडून करण्यात आलेले आहे.
Pashupalan Yojana
हा अतिशय महत्त्वाचा बदल 31 जानेवारी 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेला आहे. वहा बदल शेतकऱ्यांच्या हिताचा ठरणार आहे हा बदल झाल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण देखील निर्माण झालेले दिसून येत आहे. Pashupalan Yojana