New ration shop:नवीन राशन दुकानांसाठी या 14 जिल्ह्यात अर्ज सुरू; असा करा अर्ज

New ration shop
New ration shop:नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध प्रकारचे माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून शेती योजना नोकरी जॉब तसेच विविध महत्त्वाची माहिती आपणापर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करत असतात तर अशीच माहिती म्हणजे स्वस्त धान्य दुकान म्हणजेच राशन दुकान चालवण्यासाठी एकूण 14 जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झाले असून आपण पाहणार आहोत ते कुठले जिल्हे आहेत आणि अर्ज कसा करायचा आणि कोण पात्र असणार आहेत अर्ज करण्यासाठी.
नवीन राशन दुकानांसाठी या 14 जिल्ह्यात अर्ज सुरू
असा करा अर्ज
नवीन राशन दुकान चालविण्यासाठी ज्या ठिकाणी राशन दुकान एक आहे त्या ठिकाणी दोन राशन दुकान करणे व ज्या ठिकाणी राशन दुकान अस्तित्वात नाही त्या ठिकाणी नवीन राशन दुकान स्थापन करणे यासाठी नवीन राशन दुकान देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. New ration shop
ज्या गावांमध्ये गावातील राजकारणामुळे त्या गावचे राशन दुसऱ्या गावाला जोडले आहे किंवा आपल्या गावातील राशन दुसऱ्या गावातील व्यक्ती चालवत आहे अशा ठिकाणी गावातील लोकांच्या मागणीमुळे शासनाने नवीन शासन निर्णय काढला असून त्यामुळे त्या ठिकाणी नवीन दुकान चालविण्याचा परवाना देण्याकरता शासनाने शासनाने नवीन मागणी केली आहे.
गावातील वाढती लोकसंख्या विचारात घेता शासनाने ज्या ठिकाणी एक राशन दुकान आहे त्या ठिकाणी दोन राशन दुकान करून नवीन राशन दुकान लोकसंख्येच्या प्रमाणात चालू करण्यासाठी अर्ज मागविले आहेत. वरील प्रमाणे राशन दुकान चालू करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज कसे करायचे त्या संदर्भातील माहिती पोस्टमध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल.
राशन दुकान चालू करण्यासाठी अर्ज कसा करायचा व अर्ज करण्यासाठी कोण पात्र असणार आहे.
शासन निर्णय दिनांक ६ जुलै 2017 व शासन पत्र दिनांक सात सप्टेंबर 2018 नुसार नवीन रस्ता भाव दुकान खालील प्राधान्यक्रमानुसार मंजूर करण्याचे नमूद केले आहे त्यानुसार खालील प्रमाणे संस्था गट यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
- पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था)
- नोंदणी कृत स्वयंसहायता बचत गट
- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था
- संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था केव्हा न्यास
वरील प्राधान्यक्रमानुसार रास्त भाव दुकान व किरकोळ केरोसीन परवाने मंजूर केलेल्या दुकानाचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाद्वारे करणे आवश्यक राहील.