नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की तुमच्या गावांमधील घरकुल यादी gharkul yojana maharstra ऑनलाईन कशी पाहायची ते. सदरच्या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की तुमच्या गावांमधील आतापर्यंत तुमच्या ग्रामपंचायतीने कोणाकोणाला घरकुल दिले आहेत कुठल्या वर्षी कोणाला घरकुल दिले आहेत आणि कुठल्या योजनेतून कोणाला घरकुल दिले आहे याची माहिती आपण पाहणार आहोत.
👉तुमच्या गावची घरकुल यादी पाहण्यासठी👈
👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
तर सर्वात आधी तुम्हाला पोस्टमध्ये दिलेल्या लिंक gharkul yojana वर क्लिक करायचे आहे. तुम्हाला लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ही शासनाची वेबसाईट ओपन होईल.
सदरची साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला gharkul yojana त्या ठिकाणी वरच्या साईट वरती बरेच ऑप्शन दिसतील. त्यामधील awaassoft या ऑप्शनला क्लिक करायचा आहे.awaassoft ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याठिकाणी एकूण पाच ऑप्शन पाहण्यास मिळतील.

त्यामधील दोन नंबर चा ऑप्शन Report ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचे आहे. रिपोर्ट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी A,B,C,D,E,F,G,H याप्रमाणे ऑप्शन दिसतील. तर यामधील H Social audit report या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी selection filters म्हणून एक ऑप्शन ओपन होईल. तर यामधील माहिती तुम्हाला भरत चालायचे आहे. पहिली माहिती आहे तुमचे राज्य निवडायचा आहे, त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचे ज गावाची माहिती हवी आहे त्या गावाचे नाव निवडायचे आहे, गावाचे नाव निवडल्यानंतर तुम्हाला कुठल्या वर्षीची माहिती हवी आहे ते वर्ष निवडायचे आहे.
वर्ष निवडल्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला कुठल्या योजनेतून gharkul yojana घरकुल मिळाले आहेत त्याची माहिती हवी आहे त्या योजनेची निवड करायची आहे. यामध्ये भारतामध्ये घरकुलासाठी जेवढे योजना अस्तित्वात आहेत त्या सर्व योजनांची माहिती पाहण्यास मिळते.
त्याच्यानंतर या ठिकाणी एक कॅपच्य कोड दिलेला आहे जसे की 78-30 तर याचा अर्थ असा आहे की आज त्यात तर मधुन तीच गेल्यास खाली किती उरतात आणि येणारे उत्तर answer च्या ठिकाणी टाकायचे आहे.

याला सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल तर यामध्ये तुम्हाला थोड्या फार प्रमाणात तुमच्या गावाची घरकुल यादी दिसेल परंतु तुम्हाला जर सर्व माहिती हवी असेल तर या ठिकाणी तुम्हाला एकूण तीन ऑप्शन दिसतील. त्यामधील डाउनलोड पीडीएफ लाल रंगांमधील जी ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या गावची पुर्ण घरकुल यादी डाऊनलोड होईल.
वरील लेख कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा आणि सदरील लेखाचे कोणीही पुनर्मुद्रण केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.