PM Kisan Scheme :पीएम किसान योजनेचा 13 वा हफ्ता खात्यात नाही जमा झाला, शेतकऱ्यांनी येथे करावी तक्रार

0
PM Kisan Scheme

PM Kisan Scheme

PM Kisan Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पीएम किसान योजनेच्या 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वळता केला. पण हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली नसेल तर तुम्हाला त्याविरोधात तक्रार दाखल करता येते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पंतप्रधान किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत देशातील 8 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात DBT च्या माध्यमातून रक्कम वितरीत केली. सोमवारी पीएम किसान योजनेच्या 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात आला. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16,000 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम जमा करण्यात आली. या योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 2,000 रुपयांचा निधी तीन समान हप्त्यात देण्यात येतो. शेतकऱ्याच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपये जमा करण्यात येतात. पण हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली नसेल तर तुम्हाला त्याविरोधात तक्रार (PM-KISAN Scheme Complaint Number) दाखल करता येते.

वर्ष 2019 मध्ये मोदी सरकारने पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना सुरु केली. देशभरातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या समान तीन हप्त्यात ही रक्कम वितरीत करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेत आतापर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय देण्यात आले आहे. 2.25 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम छोट्या आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. रक्कम जमा झाली नसल्यास तक्रार दाखल करता येते.

खात्यात रक्कम आली की नाही असे तपासा

  1. पीएम किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) तुमच्या खात्यात जमा झाला असेल.
  2. त्याचा पडताळा घेण्यासाठी यासंबंधीची अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर जा.
  3. त्याठिकाणी ‘Farmers Corner’ वर क्लिक करा.
  4. Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा. नवीन पेज उघडेल.
  5. लाभार्थ्याचा आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल क्रमांक हा तपशील द्यावा लागेल.
  6. ‘Get Data’ वर क्लिक केल्यानंतर त्याठिकाणी हप्त्यासंदर्भातील सद्यस्थितीत दिसेल.

खात्यात नाही जमा झाली रक्कम,

शेतकऱ्यांनी येथे करावी तक्रार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *