Maharashtra Assembly Budget 2023:आता केवळ 1 रुपयांत पीकविमा,महिलांना एसटी बस तिकीट दरात 50 टक्के सवल

Maharashtra Assembly Budget 2023:राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्याच योजनांची घोषणा केली. या अर्थसंकल्पात बऱ्याच योजना देखील लक्षवेधी ठरल्या. “आज तुकाराम बीज. जगदगुरु तुकाराम महाराजांच्या ‘पिकवावे धन । ज्याची आस करी जन ॥’ या तत्वास अनुसरुन अर्थसंकल्प”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली.

आता केवळ 1 रुपयांत पीकविमा,महिलांना एसटी बस तिकीट दरात 50 टक्के सवल

नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 12 हजार रुपये

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना
कर्जमाफी योजनांचे लाभ

– 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्‍यांना योजनेचे लाभ देणार
– महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.Maharashtra Assembly Budget 2023

– 12.84 लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा.

‘मागेल त्याला शेततळे’
योजनेचा आता व्यापक विस्तार

– मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार
– आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण
– मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर
– या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत

– गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
– आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
– ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्ण त्रास वाचणार
– अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
– नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
– 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
– 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार
– डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ
– 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी

शेतकर्‍यांना अन्नधान्याऐवजी
थेट रोखीने आर्थिक मदत!

– विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत
– अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात
– प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये देणार

आता केवळ 1 रुपयांत पीकविमा,महिलांना एसटी बस तिकीट दरात 50 टक्के सवल

नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 12 हजार रुपये

Leave a Comment