lek ladki yojana:महाराष्ट्रातील मुलींसाठी लेक लाडकी योजना सुरू; मुलीच्या जन्मानंतर मिळणार 75 हजार रुपये

lek ladki yojana:राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्याच योजनांची घोषणा केली. या अर्थसंकल्पात बऱ्याच योजना देखील लक्षवेधी ठरल्या. “आज तुकाराम बीज. जगदगुरु तुकाराम महाराजांच्या ‘पिकवावे धन । ज्याची आस करी जन ॥’ या तत्वास अनुसरुन अर्थसंकल्प”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली.

“या” कुटुंबाना मिळणार लाभ

पाहण्यासाठी यावर क्लिक करा

एकीकडे महिला दिनाला महिलाशक्तीला सलाम केला जात असताना त्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी बऱ्याच विशेष घोषणांची तरतूद करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरण, विकास आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारनेही अतिशय महत्त्वाची पाऊले उचलत असल्याचे चित्र आहे. स्त्रीभ्रूण हत्या, मुलींना समाजात दुय्यम स्थान देणे यांमुळे आजही असंख्य महिला स्वावलंबी नाहीत. मात्र हे चित्र बदलावे यासाठी शासन दरबारी प्रयत्न होताना दिसत आहेत (Lek Ladki Yoajana Scheme By Maharashtra State Government Know How Much Amount One Can Get in Same).

काय आहे नेमकी योजना ? lek ladki yojana

मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर ५००० रुपये जमा केले जातील. त्यानंतर चौथीत असताना ४०००, सहावीत असताना ६००० आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात ८००० रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख मिळतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे मुलीच्या शिक्षणाचा, पालनपोषणाचा आणि इतर खर्च करणे सोपे होणार आहे. अल्प उत्पन्न गटातील मुलींनी शिकावे, स्वत:च्या पायावर उभे राहावे यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे.

याशिवायही महिलांना एसटी प्रवासात सूट, अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या मानधनात वाढ यांसारख्या अनेक योजना जाहीर केल्या. त्यामुळे अर्थसंकल्प महिलांच्यादृष्टीने अतिशय फायदेशीर असल्याचे चित्र आहे.

“या” कुटुंबाना मिळणार लाभ

पाहण्यासाठी यावर क्लिक करा

Leave a Comment