bombay high court recruitment:मुंबई उच्च न्यायालयात 4थी उत्तीर्णांसाठी भरती सुरु ; पगार 47000 पर्यंत

bombay high court recruitment:नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना तसेच सरकारी नोकरी व इतर महत्त्वाची माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. सर्व शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवने हा आपला उद्देश आहे. तर अशीच माहिती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयात 4थी उत्तीर्णांसाठी भरती सुरु ; पगार 47000 पर्यंत जागाची पूर्ण माहिती आपण आज जाणून घेऊया.

जाहिरात पाहण्यासाठी

व अर्ज करण्यासाठी

मुंबई उच्च न्यायालयामध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. फक्त चौथी पास उमेदवारांना मोठी संधी आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 27 मार्च 2023 आहे.

पदाचे नाव : स्वयंपाकी / Cook
शैक्षणिक पात्रता : 01) उमेदवार कमीत-कमी चौथी पास असावा. 02) उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पूरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.

वयाची अट : 10 मार्च 2023 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 200/- रुपये
पगार (Pay Scale) : सदर पदाची वेतन मेट्रिक्स 15,000/- रुपये ते 47,600/- व भत्ते अशी आहे.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 27 मार्च 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – 400001.

उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्यांच्या स्वतः प्रमाणित (Self-attested) केलेल्या छायांकित प्रति सादर कराव्यात.bombay high court recruitment
१) जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला
२) शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक
३) शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे प्रमाणपत्र
४) जाहिरात प्रसिध्दी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीचे (कमीत कमी ५ वर्षांपासून ओळखत असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( त्यांचा हुद्दा, पत्ता व फोन नंबर सह) (जाहीरातीसोबत परिशिष्ट ‘ब’ नमुन्यात)
५) स्वयंपाक कामाचा अनुभवाचा दाखला ६. स्वयंपाकाचा विशेषतेसंबंधीचा दाखला (असल्यास)
७) सक्षम अधिका-याने प्रदान केलेला जातीचा दाखला
८) महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
९. अर्जदाराने त्याला बनवता येणाऱ्या खाद्य पदार्थांची यादी सोबत जोडावी
१०) उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला
११) विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला
१२) सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी

जाहिरात पाहण्यासाठी

व अर्ज करण्यासाठी

Leave a Comment