land record:जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक होऊ नये यासाठी आधी एक कागद आवर्जून पाहायला सांगतात. ते म्हणजे खरेदी खत.
खरेदी खत म्हणजे काय तर जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा. यावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या दोन व्यक्तींमध्ये, किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झाला याची सविस्तर माहिती असते.
1985 सालापासूनचे खरेदी खत,
जुने दस्त ऑनलाईन पाहण्यासाठी
खरेदी खत झालं की ती माहिती फेरफारवर लागते आणि मग सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद होते.
ता 1985 पासूनचे खरेदी खत तुम्ही तुमच्या मोबाईल 2 मिनिटांत पाहू शकता. ते कसं त्याचीच माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.
खरेदी खत, जुने दस्त असे पाहा…
जुने खरेदी खत पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला पोस्ट मधी दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे .
त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. या वेबसाईटवर खाली स्क्रोल केलं की ऑनलाईन सर्व्हिसेस नावाचा एक रकाना तुम्हाला दिसेल.
इथे पहिला पर्याय असलेल्या ई-सर्चवर क्लिक करायचं आहे. तेथील विनाशुल्क सेवा रकान्यातील फ्री सर्च 1.9 वर क्लिक करायचं आहे. (2.0 नवीन व्हर्जन आहे, जे अंडर मेंटेनन्स आहे.)land record
त्यानंतर सर्च फ्लो नावाचं पेज ओपन होईल. त्यावर सर्च कसं करायचं याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याला क्लोज केलं की एक नवीन पेज ओपन होईल.

फोटो स्रोत,IGRMAHARASHTRA.GOV.IN
इथं तुम्ही मिळकत निहाय आणि दस्त निहाय जमिनीचा रेकॉर्ड सर्च करू शकता. मुंबई, उर्वरित महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रातील शहरी भाग अशा 3 प्रकारांमध्ये तो सर्च करता येतो.
सुरुवातीला आपण मिळकत निहाय जमिनीचा रेकॉर्ड सर्च कसा करायचा ते पाहूया.
आता आपल्याला एखाद्या गावातील रेकॉर्ड पाहायचा असल्यानं इथं उर्वरित महाराष्ट्र निवडायचं आहे.
इथं सुरुवातीला वर्षं निवडायचं आहे. तुम्ही पाहू शकता की, इथं 1985 पासूनच्या खरेती खतांचा, दस्तांचा रेकॉर्ड उपलब्ध आहे.
त्यानंतर जिल्हा, तहसील कार्यालय आणि गाव निवडायचं आहे. मग मिळकत क्रमांक टाकायचा आहे. इथं कंसात लाल अक्षरात स्पष्ट लिहिलंय की, सर्व्हे नंबर / मिळकत नंबर / गट नंबर / प्लॉट नंबर टाकू शकता.
पुढच्या रकान्यात कॅप्चा टाकायचा आहे. म्हणजे पुढच्या रकान्यात दिसणारे अंक, अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत.

फोटो स्रोत,IGRMAHARASHTRA.GOV.IN
पण, तुम्हाला मिळकत क्रमांक माहिती नसेल तर Do you want to take Name Based Search:(Optional) या रकान्यासमोरील YES या पर्यायावर क्लिक करून सर्च करू शकता. म्हणजे नाव टाकून सर्च करू शकता.
मिळकत क्रमांक टाकला की, शोधा किंवा सर्च यावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला जुन्या दस्तांची माहिती दिसेल. यात दस्तांचा क्रमांक, दस्ताचा प्रकार (खरेदी खत), कोणत्या तारखेला आणि कोणत्या कार्यालयात नोंदणी झालीय, जमीन देणाऱ्याचं आणि घेणाऱ्याचं नाव, किती क्षेत्रासाठी खरेदी झालीय याच वर्णन दिलेलं दिसेल.
याच लाईनमधील शेवटच्या इंडेक्स2या पर्यायावर क्लिक करून तुम्ही हे खरेदी खत डाऊनलोड करू शकता.
दस्तनिहाय कसं पाहायचं?
समजा तुमच्याकडे मिळकत नंबर नसेल तर तुम्ही दस्त नंबर टाकून जमिनीचा रेकॉर्ड सर्च करू शकता. त्यासाठी दस्तनिहाय या पर्यायावर क्लिक केलं की Regular वर टिक करायचं आहे. त्यानंतर जिल्हा, दुय्यम निंबधक कार्यालय, वर्ष आणि दस्त क्रमांक टाकायचा आहे. पुढे कॅप्चा टाकून शोधावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर खालच्या बाजूला दस्त क्रमांक, त्याचा प्रकार, किती तारखेला आणि कोणत्या कार्यालयात त्याची नोंदणी झालीय, या व्यवहारातील जमीन लिहून घेणार आणि देणार कोण आहेत, तसंच मालमत्तेचं वर्णन दिलेलं असतं.
याच लाईनमधील शेवटच्या इंडेक्स 2 या पर्यायावर क्लिक केलं की ते खरेदी खत डाऊनलोड करू शकता.