free bus pass:महिलांना आता खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये ५० टक्के सवलत, कोण देणार ही सवलत

free bus pass
free bus pass:एसटी महामंडळाच्या महिला सन्मान योजनेतील प्रवासात 50 टक्के सवलत आहे. त्याचा परिणाम खासगी वाहतुकींवर झाला होता. खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या कमी झाली. यामुळे खासगी ट्रव्हल्सनेही महिलांना सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
महिलांना आता खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये ५० टक्के सवलत,
कोण देणार ही सवलत पाहण्यासाठी यावर क्लिक करा
राज्य सरकारने नुकतीच राज्य परिवहन महामंडळच्या बसेसमध्ये महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सूट देण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये महिलांची गर्दी वाढल्याचे चित्र समाजमाध्यमावर दिसू लागले होते. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनांमध्ये महिला प्रवाशांची संख्या रोडावली होती. याच धर्तीवर आता खासगी बसमध्ये सुध्दा महिलांना पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज गुडीपाडवापासून नवे तिकीट दर लागू करण्यात आले आहे.free bus pass
का घेतला निर्णय
शासनाने जाहीर केलेल्या सवलतीमुळे खासगी बसपेक्षा एसटी महामंडळाच्या बसमधून महिला प्रवास करु लागल्या. यामुळे खासगी ट्रव्हल्सला प्रवाशी मिळत नव्हते. त्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत खाजगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता खाजगी बसेसमध्ये सुध्दा महिला प्रवाशांची संख्या पूर्वपदावर येईल. एसटी महामंडळाने बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी नियम तयार केले आहे. परंतु खासगी ट्रव्हल्सकडे असे काही नियम नाहीत.
महामंडळाचे काय आहेत नियम
एसटी महामंडळाच्या महिला सन्मान योजनेतील प्रवासात 50 टक्के सवलत आहे. मात्र या प्रवासासाठी रिझर्वेशन करता येईल का? महिलांसाठी वेगळे तिकीट देणार की सर्वांना सेम असणार? सवलत असलेली बस ओळखायची कशी? एसी बसला सवलत असेल की फक्त नॉन एसी बस? हा सगळ्या प्रश्नांची उत्तरेही जाणून घेऊ.
सवलतीचे नियम व अटी
- सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50 टक्के सूट मिळणार आहे. साधी, मिनी बस, निमआराम म्हणजेच एशियाड गाडी, विनावातानुकुलित शयनयान, शिवशाही, शिवनेरी, शिवाई यांच्यांत सवलत
- महिलांसाठी सवलत असलेल्या तिकीटाची रंगसंगती वेगळी असणार आहे.
- प्रवासी भाड्यातील अपघात साहाय्यता निधी आणि एसी बससेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात येणार आहे. म्हणजे तुमचं तिकीट 10 रुपये असेल तर त्यावर तु्म्हाला 5 रुपये सवलत मिळेल आणि त्यावर 2 रूपये कर म्हणजे तुम्हाला 7 रूपये तिकीट काढावे लागणार.
- राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी कुठेही फिरता येणार आहे. मात्र राज्याबाहेर जायचे असेल तर तुम्हाला तिकीटाचा वेगळा दर द्यावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही मुंबईपासून बेळगावला जाण्यासाठी निघालात तर तुम्हाला महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच ही सवलत लागू होणार, तिथून पुढे पूर्ण तिकीट आकारले जाईल.
- शहरी वाहतुकीस महिलांना ही सवलत मिळणार नाही
- आरक्षण करून प्रवास करायचा विचार करत असतील तर त्यांना ही सवलत लागू होणार नाही
- 5 ते 12 वयोगटातील मुलींना यापूर्वी प्रमाणेच 50 टक्के सवलत असणार आहेत
- 75 वर्षांवरील महिलांसाठी अमृत जेष्ठ नागरिक योजना लागू होत आहे. त्यामुळे त्यांना मोफत प्रवास करता येणार आहे.