राज्यात शिंदे-फडणवीस सरकार 2017 18, 2018 19 आणि 2019 20 या काळात नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देऊ करत आहे. या अनुषंगाने पहिली आणि दुसरी यादी लाभार्थी शेतकऱ्यांची समोर आली असून ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे अशा शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम देखील वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात तहसील स्तरावर 187 तक्रारी दाखल झाल्यात यापैकी 138 तक्रारी सोडवल्या गेल्या आहेत. डीएलसी स्तरावर 268 तक्रारी आल्या असून 102 तक्रारी सोडवल्या गेल्या आहेत. दरम्यान आता शेतकरी बांधव प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी केव्हा येईल याबाबत उत्सुक आहेत.