या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास एक लाख 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे यासाठी खालील कागदपत्र दाखल करावी लागतील.
1) प्रथम खबरी अहवाल
2) स्थळ पंचनामा
3) इन्वेस्ट पंचनामा
4) सिव्हिल सर्जन यांचा मृत्यू दाखला.
सदर योजनेअंतर्गत अपघातामुळे कायमचे अपंगत्व (दोन अवयव दोन डोळे किंवा एक अवयव व एक डोळा निकामी) यासाठी एक लाख रुपये अनुदान मिळणार आहे.
अपघातामुळे कायमचे अपंगत्व (एका अवयव किंवा एक डोळा कायम निकामी) यासाठी 75 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये शस्त्रक्रिया बाबाचे हॉस्पिटल चे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रती स्वाक्षरीसह द्यावे लागेल