“या” शेतकऱ्यांना मिळणार लाभ

गडकरी म्हणाले , राज्याच्या इतर भागांच्या | तुलनेत मराठवाडा विदर्भात दूध उत्पादन अत्यल्प आहे . त्यास चालना देण्यासाठी ‘ एनडीडीबी’च्या माध्यमातून मदर डेअरींचा ” प्रकल्प या भागात कार्यान्वित करण्यात आला . त्यातून दुधाची उत्पादकता वाढली असली तरी ती अपेक्षित नाही . त्यामुळे कृत्रिम रेतन , हिरव्या चाऱ्याची लागवड व इतर अनेक उपक्रम नियोजित आहेत . त्याकरिता ३०० कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे . यातूनच मदर डेअरी अंतर्गतच्या दूध संघांना ११ हजार दुधाळ जनावरांचे वितरण केले जाईल .