बँक कर्जासाठी अर्ज कसा करावा व अधिक माहितीसाठी कोठे संपर्क साधावा ?

10 म्हशींच्या डेअरीवर किती मिळू शकतं बँक कर्ज :-

10 म्हशींची डेअरी उघडायची असेल तर 10 लाख रुपये लागतील. यापैकी तुम्हाला बँकेकडून कमाल 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकतं. यावर, तुम्हाला कृषी मंत्रालयाच्या DEDS योजनेत सुमारे 2.5 लाख रुपयांची सबसिडी मिळेल. हे अनुदान नाबार्डकडून दिलं जातं.

बँक कर्जासाठी अर्ज कसा करावा ?

बँकेच्या कर्जासाठी अर्ज करताना, सर्वप्रथम तुम्हाला एक डेअरी प्रकल्प (Dairy Project) बनवावा लागेल आणि तुम्हाला किती जनावरे डेअरी उघडायची आहेत. त्या आधारे तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळेल. यासोबतच कर्ज घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे द्यावी लागतील जी खालीलप्रमाणे आहेत :-

अर्जदाराचे आधार कार्ड
अर्जदाराचे पॅन कार्ड
अर्जदाराचे जात प्रमाणपत्र
अर्जदाराच्या बँक खात्याचा कॅन्सल चेक
बँकेचे ना-हरकत प्रमाणपत्र
याशिवाय Dairy Project रिपोर्टचे झेरॉक्स

योजनेबद्दल अधिक माहितीसाठी कोठे संपर्क साधावा ?

योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही तालुका विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता. याशिवाय तुमच्या नजीकच्या डेअरी पशू विकास केंद्र आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधून दूध उत्पादन, पशुधन आणि अनुदान या विषयावर माहिती मिळवू शकता..

अधिक माहितीसाठी तुम्ही startupindia.gov.in या व्हेबसाईटला भेट द्या.

अर्ज भरण्यासाठी PDF फॉर्म डाउनलोड करण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करा