शेत रस्त्यासाठी सोप्या भाषेत हा अर्ज कसा लिहायचा

त्यानंतर मायनामध्ये तुम्ही असं लिहू शकता…

मी रवी येडे रा.कोळगाव येथील कायम रहिवासी आहे. कोळगाव येथील गट क्रमांक ६४५ मध्ये माझ्या मालकीची 2 हेक्टर 10 आर शेतजमीन आहे. सदरहू जमिनीमध्ये जाणं-येणं करण्यासाठी गाव नकाशावर रस्ता नाही. त्यामुळे शेतात बैलगाडी-ट्रॅक्टरमधून शेती अवजारं, बी-बियाणं आणि रासायनिक खतं नेण्यास अडचण निर्मान होत आहे. तसंच शेतातील माल सोयाबीन, तूर, मका, उडीद, मूग, गहू, हरबरा, घरी आणण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.

तरी मौजे कोळगाव ता.महाड येथील गट क्रमांक६४५ मधील पूर्व-पश्चिम धुऱ्याच्या हद्दीवरून गाडीबैल शेतात नेणे व घरी आणणे करता येईल, असा कायमस्वरूपी शेत रस्ता मंजूर करण्यात यावा, ही विनंती मी आपणास करत आहे.

आपला विश्वासू,

रवी येडे