ऊस तोड यंत्रांना मिळणार 35 लाख अनुदान  येथे करावा लागणार अर्ज

वैयक्तिक शेतकरी, उद्योजक यांच्याबाबत एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकच ऊस तोडणी यंत्रासाठी संपूर्ण योजना कालावधीत अनुदान देण्यात येणार आहे.

तसेच सहकारी व खासगी कारखान्यांना प्रत्येकी जास्तीत जास्त तीन यंत्रांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी यंत्रांच्या किमतीच्या किमान २० टक्के रक्कम स्वभांडवल म्हणून गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

उर्वरित रक्कम कर्जरूपाने लाभार्थ्यांनाच उभी करावी लागणार आहे. यंत्र खरेदी अनुदान मिळविण्यासाठी अर्जदारांनी परिपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या ‘महा-डीबीटी’ पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे.