बांधकाम कामगार सेफ्टी किट चा लाभ कसा मिळवायचा? How to Apply for Bandhkam Kamgar Safety Kit?
सर्वप्रथम जर तुम्ही अजून पर्यंत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार विभाग यांच्याकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. जर तुम्ही यापूर्वी नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला आता विहित नमुन्यातील बांधकाम कामगार सेफ्टी किट चा ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे. सुरक्षा संचाचा अर्ज करण्याची लिंक तसेच अर्जाचा पीडीएफ आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे.
वरील अर्जासोबत तुम्हाला तुमच्या आधार कार्ड तसेच नोंदणी केल्याची पावती तसेच बांधकाम कामगार ओळखपत्र तुम्हाला बांधकाम कामगार विभागाकडे सुपूर्द करायचं आहे.
वरील अर्ज केल्यानंतर तुम्ही बांधकाम कामगार सुरक्षा पेटी म्हणजेच सुरक्षा संच मिळवू शकाल