‘हे’ काम 5 सप्टेंबरपूर्वी नाही केल्यास लाभ मिळणार नाही

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. ही रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये वर्ग होणार आहे. त्यासाठी वापरात असलेले बँक खाते 5 सप्टेंबरपूर्वी आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बचत खात्याशी लिंक नाही, त्यांनी तातडीने लिंक करून घ्यावे, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.