सिमेंटसह सळईच्या आजच्या  किंमती पहा

साहित्याच्या किंमती घटल्या

सरकारने बांधकाम साहित्याच्या किंमती घटल्याची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, टीएमटी सळईचा घाऊक भाव 65 हजार रुपये प्रति टन रुपयांच्या जवळपास पोहचला आहे. हा भाव एप्रिल महिन्यात 75 हजार रुपये प्रति टन इतका होता. तर सळईचे किरकोळ भाव 60 हजार रुपये प्रति टनाहूनही खाली उतरला आहे. एप्रिल महिन्यात हाच भाव 80 हजार रुपयांच्यावर पोहचला होता. तर ब्रँडेच सळईचा भाव एप्रिल महिन्यात एक लाख रुपये प्रति टनवर पोहचला होता. हा भाव आता 85 हजार रुपये प्रति टनाहूनही खाली घसरला आहे. यासोबतच सिमेंटच्या भावात ही घसरण दिसून आली. एप्रिल महिन्यात 50 किलो सिमेंटची थैली 450 रुपयांच्यावर पोहचली होती. सध्या हा भाव 400 रुपयांहून ही घसरला आहे. विटांच्या किंमतीत ही घसरण दिसून येत आहे. घर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य जसे टाईल्स, वाळू आणि राख यांच्या किंमतीत ही घसरण झाली आहे.