weather report today :पावसाचं पुन्हा जोरदार कमबॅक ; महाराष्ट्रातील ‘या’ 5 जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस ! पंजाबराव डक यांचा  नवीन अंदाज  ?

weather report today :पावसाचं पुन्हा जोरदार कमबॅक ; महाराष्ट्रातील ‘या’ 5 जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस ! पंजाबराव डक यांचा  नवीन अंदाज  ?

Maharashtra Rain : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानातं मोठा बदल पाहायला मिळत आहे. आता राज्यातील ढगाळ हवामान निवळत चालले असून कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

https://krushi.knowledgenews.in/2024/01/06/pm-kisan-beneficiary-list/

डिसेंबरच्या अगदी सुरुवातीलाच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस बरसला होता.

पण आता चक्रीवादळ पूर्णपणे निवळले असून याचा परिणाम म्हणून आता राज्यातील गाराठा वाढू लागला आहे.

weather report toda राज्यातील बहुतांश भागातील ढगाळ हवामान निवळले असून गारठा वाढत चालला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये किमान तापमान पंधरा अंशाच्या खाली आले आहे.

अशातच आता भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील दक्षिण भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IMD ने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूर्णपणे निवळून गेली आहे पण आता नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

weather report toda याचा परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात गारठा वाढलेला दिसत असला तरी देखील येत्या काही तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता तयार होत आहे.

यामुळे गेल्या महिन्यात आणि या चालू महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांची पुन्हा एकदा अवकाळी पाऊस चिंता वाढवणार असे चित्र तयार होत आहे. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे.

IMD नुसार, उद्या अर्थातच 17  रोजी राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सातारा, सांगली, कोल्हापूर अशा एकूण 5 जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

यामुळे यासंबंधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *